Pune-Muzaffarpur Special Train : पुणे ते मुझफ्फरपूर दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे

एमपीसी न्यूज – पुणे ते मुझफ्फरपूर दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. 4 मे ते 1 जुलै या दरम्यान 18 रेल्वे दोन्ही मार्गावर धावणार आहेत. ही गाडी दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपुर मार्गे धावेल. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक 05290 पुणे- मुझफ्फरपूर सुपरफास्ट एसी विशेष रेल्वे 6 मे ते 1 जुलै दरम्यान (9 ट्रीप) दर सोमवारी पुण्याहून सकाळी 6.30 वाजता सुटेल आणि मुझफ्फरपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी 3.15 वाजता पोहोचेल.

Nigdi : भारताची वाटचाल कलियुगातून सत्ययुगाकडे – तुषार दामगुडे

गाडी क्रमांक 05289 मुझफ्फरपूर – पुणे सुपरफास्ट एसी विशेष रेल्वे 4 मे ते 29 जून दरम्यान (9 ट्रीप) दर शनिवारी मुझफ्फरपूर येथून रात्री 9.15 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे 5.35 वाजता पुण्याला पोहोचेल.

ही गाडी हडपसर, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर,  पाटलीपुत्र आणि हाजीपूर येथे थांबेल. या गाडीसाठीचे आरक्षण ऑनलाईन माध्यमातून सुरु करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.