LokSabha Elections 2024 : ‘हातभर तक्रारी, बोटभर उपाय’, ‘आपले मत आपला हक्क, चला मतदान करूया’…

एमपीसी न्यूज – ‘हातभर तक्रारी, बोटभर उपाय’, ‘आपले मत आपला हक्क, चला मतदान करूया’, असा संदेश देत चिंचवड ( LokSabha Elections 2024 ) विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृती करण्यात आली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 205 चिंचवड  विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मॉल ऑफ मिलेनियम, वाकड येथे मतदान जनजागृती  करण्यात  आली. मॉलचे मॅनेजर अमित अम्बुरे, गणेश भगत, बापुसाहेब गवळी, विनोद जाधव, सुमिधा तिडके, रीझवाना शेख व इतर कर्मचारी तसेच 205 चिंचवड विधानसभा मतदार स्वीप टिमचे नोडल अधिकारी राजाराम सरगर व स्वीप व्यवस्थापन टीम यावेळी येथे उपस्थित होते.

Pune : उमेदवार दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर

 

यामध्ये कर्मचा-यांना मतदान करण्यासाठी एक उत्साह मिळाला तसेच ‘आपले अमूल्य मत, करेल लोकशाही मजबूत’, ‘एक दोन तीन चार, मतदानाचा मजबूत विचार’, असा संदेश देण्यात आला. विविध प्रकारची घोषवाक्ये यामार्फत जागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचा-यांकडून मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली आणि मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

चिंचवड येथील एस.के.एफ कंपनीत मतदान जनजागृती  करण्यात  आली. यामध्ये कर्मचा-यांना मतदान करण्यासाठी एक उत्साह मिळाला. तसेच ‘हातभर तक्रारी, बोटभर उपाय’, ‘आपले मत आपला हक्क, चला मतदान करूया’, असा संदेश देण्यात आला. कंपनीचे एचआर मॅनेजर अनंत देवकाते, सचिन अडसुळ, किशोर कदम, अक्षय येडे, मंजूनाथ करकेट्टी, बापू पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होते. विविध प्रकारची घोषवाक्ये यामार्फत जागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचा-यांकडून मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली आणि मतदान करण्याचे आवाहन करण्यात ( LokSabha Elections 2024 ) आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.