Pune : पत्नी नांदायला येत नाही म्हणून पोलीस चौकीत पतीचा पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज –  पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून (Pune) पतीने पोलीस चौकीतच अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पुण्यातील चंदननगर  भागात घडली.

Google Doodle : भारताची पहिला व्यावसायिक कुस्तीपटू हमीदा बानो यांना गुगल डूडलकडून मानवंदना

आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी नवनाथ कचरू लोखंडे (वय 26 रा. डोमखेल रस्ता, वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई मुकेश पानपाटील (वय 31) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ आणि त्याच्या पत्नीत वाद झाले होते. ती माहेरी निघून आली होती. सासू-सासऱ्यांच्या सांगण्यावरुन पत्नी नांदायला येत नसल्याने नवनाथ चिडला होता. तो सासूरवाडीत गेला. त्यावेळी त्याने पत्नीच्या मोबाईल वर संपर्क साधला. तेव्हा तिने चंदननगर पोलीस ठाण्याच्या अखत्यारीतील महात्मा फुले पोलीस चौकीत असल्याचे सांगितले.

त्यानंतर नवनाथ तेथे गेला. पोलीस चौकीत जाताना त्याने दुचाकीतील पेट्रोल बाटलीत भरले. पोलीस चौकीत गेल्यानंतर त्याने सासू-सासऱ्यांविरुद्ध तक्रार केली. पत्नी नांदायला येत नसल्याने चिडलेल्या नवऱ्याने अंगावर बाटलीतील पेट्रोल ओतले. पोलीस चैाकीतील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून त्याला (Pune) रोखले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.