Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत महाराष्ट्र दिन साजरा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस ( Talegaon Dabhade) साजरा करण्यात आला. मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या हस्ते नगरपरिषदेत ध्वजारोहण करण्यात आले. कामगार दिनानिमित्त शहरातील उत्कृष्ट शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी तळेगाव दाभाडे नगरपरिषद अंतर्गत येणा-या सर्व शाळेंचे मुख्याध्यापक,शिक्षक,विद्यार्थी व नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Maval : पुणे जिल्हा काँग्रेस सांस्कृतिक सेलच्या सरचिटणीस पदी नफीस रेहमत खान यांची निवड

महाराष्ट्र राज्यात दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 1960 मध्ये महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून स्थापन झाल्याचा हा दिवस आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीचे वैभव लक्षात ठेवण्याची आणि राज्याचा समृद्ध वारसा समजून घेण्याची संधी हा दिवस देतो. महाराष्ट्राच्या स्थापना दिनाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.अशी माहिती मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी उपस्थितांना दिली.
1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. या कामगार दिनाचे औचित्य साधून मुख्याधिकारी एन.के.पाटील व उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या हस्ते उत्कृष्ठ शिक्षक,कर्मचारी व अधिकारी यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. तसेच मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी मुख्याधिकारी एन.के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान ( Talegaon Dabhade) जनजागृती शहराअंतर्गत घेण्यात आली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.