Malshej Ghat : माळशेज घाटात भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू तर तीन वर्षाचा मुलगा जखमी

एमपीसी न्यूज – लग्नावरून परतणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला असून त्यांचा तीन वर्षाचा मुलगा ( Malshej Ghat) जखमी झाला आहे. हा अपघात नगर-कल्याण महामार्गावर माळशेज घाटात दुधाचा ट्रँकर व  टेम्पो यांच्यात शुक्रवारी (दि.3) भिषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भिषण होता की यात चार जण मरण पावले असून 3 वर्षाच्या बालकासह दोघे जण जखमी झाले आहेत.

या अपघातात अक्षय शांताराम दिघे (वय 33), तेजल अक्षय दिघे (वय 26 रा.पांगरी) , टँकर चालक दत्तात्रय किसन वामन (रा.पिपळवंडी)  व टेम्पो चालक शकील अमजत शेख (रा.जुन्नर)  यांचा मृत्यू झाला आहे.तर आरूष अक्षय दिघे (वय 3) हा जखमी झाला आहे . टोकवडे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद कऱण्यात आली आहे.

Pune : पत्नी नांदायला येत नाही म्हणून पोलीस चौकीत पतीचा पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघे दाम्पत्य नातेवाईकाच्या लग्नावरून दुधाच्या टँकर मध्ये बसून  मुंबईला परत जात होते. यावेळी जुन्नरला जाणाऱ्या मालवाहू टेम्पोची नगर-कल्याण महामार्गावर आवळ्याची वाडी येथे समोरासमोर धडक झाली .

ही धडक एवढी भीषण होती की या अपघातात दिघे दाम्पत्य जागीच ठार झाले. तसेच टँकर चालक ही जागीच ठार झाला. तर टेम्पो चालक ही गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मयत झाला . सुदैवाने तीन वर्षाचा आरूष वाचला . ( Malshej Ghat)  या घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून, पुढिल तपास टोकवडे पोलीस करत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.