Pune : कोरेगाव पार्क येथे भीषण अपघात; आलिशान कारने 10-15 दुचाकींना दिली धडक

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या ( Pune)  हद्दीतील कॅम्प परिसरात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील आलिशान कारने रस्त्याच्या दुतर्फा पार्क केलेल्या दहा ते पंधरा दुचाकींना धडक दिली. यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.

Pimpri : दोन तडीपार गुंडांना शस्त्रासह अटक 

आलिशान चार चाकीवरील चालक रविंद्र धनवडे (वय 32 वर्ष, राहणार शिर्डी, जिल्हा अहमदनगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. गाडी चालवत असताना फिट आल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात मोहम्मद अनिस शौकत अली खत्री (वय 29 राहणार मध्य प्रदेश) हा जखमी झाला आहे. त्याच्या पायावर गाडी जाऊन  तो जखमी झाला असून त्याला जहांगीर हॉस्पिटल येथे  उपचारासाठी दाखल केले ( Pune)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.