Chinchwad : सहकारी एजंटला कमिशनचे पैसे विभागून न देता फसवणूक

एमपीसी न्यूजपाच एजंटने मिळून एका कंपनीची 305 एकर जमीन विकली. जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर चार एजंट, एक कंपनी प्रतिनिधी आणि एक जमीन खरेदीदार यांनी मिळून 18 कोटी 25 लाख रुपये कमिशन विभागून न देता एका एजंटची फसवणूक केली. हा प्रकार 9 जानेवारी 2011 ते 5 मे 2024 या कालावधीत अन्नपूर्णा हॉटेल, चिंचवड येथे घडला.

 

गुरुप्रसाद विलोचनराम जैस्वाल (वय 63, रा. टिटवाळा पश्चिम, ता. कल्याण, जि. ठाणे) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण रमेश साळवे, रमेश साळवे, प्रेमचंद बाफना, सादिक पाशा, के विश्वनाथ आणि अरविंद जैन यांच्या विरोधात गुन्हा(Chinchwad) दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील जांभूळ येथे बीपीएल कंपनीची 305 एकर जमीन आहे. या व्यवहारात कंपनीचे प्रतिनिधी के. विश्वनाथ आणि जमीन खरेदी करणारे अरविंद जैन यांनी फिर्यादी यांना जमीन व्यवहार झाल्याची माहिती दिली नाही.

 

तसेच, फिर्यादी यांच्या चार एजंट सहकाऱ्यांना कमिशन दिल्याची माहिती फसवणूक करण्याच्या उद्देशाने न देता फिर्यादीचा विश्वासघात(Chinchwad) केला. फिर्यादी यांच्या शिष्याचे कमिशन 18 कोटी 25 लाख रुपये त्यांना विभागून न देता त्यांची फसवणूक केली.

फिर्यादी यांनी मागील दहा वर्षांपासून त्यांचे कमिशन मागण्याचा प्रयत्न केला असतात यांना आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

Nigdi : ट्रान्सपोर्टनगर येथून पिस्तूलासह एकास अटक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.