Vadgaon Maval : सेवानिवृत्ती नंतरही रयत सेवक भरीव योगदान देतो; डॉ. अनिल पाटील यांचे प्रतिपादन

एमपीसी न्यूज – न्यु इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेजच्या उपशिक्षिका शोभा मुकुंद सुर्यवंशी या 37  वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत होत आहेत. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी, सेवानिवृत्ती नंतरही रयत सेवक भरीव योगदान देतो, असे उद्गार काढले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक स्कूल कमिटी सदस्य मनोज ढोरे हे होते.

यावेळी पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, दक्षिण विभागाचे सहा. विभागीय अधिकारी अॅन्थोनी डिसूझा, मंत्र्यालयाचे निवृत्त अधिकारी किरण सूर्यवंशी, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य विनायक संकपाळ, नगरसेवक प्रविण चव्हाण,विद्यालयाचे प्राचार्य सतिश हाके, पर्यवेक्षिका प्रज्ञा गायकवाड,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका जयश्री लेंभें, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सुनिता बारवकर सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

Maval : काँग्रेस राजवटीत 100 पैकी 15 रुपयांचा निधीच लोकांपर्यंत पोहोचायचा – चित्रा वाघ

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य सतीश हाके यांनी केले. चित्रकलेच्या शिक्षिका असूनही त्यांनी विद्यार्थ्याच्या विकासासाठी स्वखर्चातून कलादालन तयार केले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तू, आणि चित्रे लावण्यात आली आहेत. तसेच त्यांचा एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल सातत्याने 100 टक्के आहे. आजी माजी विद्यार्थी व आजी माजी शिक्षक यांनी याप्रसंगी त्यांच्याविषयी गौरवउद्गार काढले. आणि त्यांना भावी आयुष्या साठी शुभेच्छा दिल्या.

कलादालन उदघाटनासाठी कलाशिक्षक राजेंद्र आडमुठे आणि दीपा गुंजाळ यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निता शेटे यांनी केले. कार्यक्रमरज्ञ यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व अध्यापक वृंदानी सहकार्य केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.