Chinchwad : गुटखा विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा; एकास अटक

एमपीसी न्यूज – शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुंडा विरोधी पथकाने रविवारी (दि. 6) मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास बिजलीनगर चिंचवड येथे केली.
नौपसिंग झालमसिंग राजपूत (वय 38, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह शरवण विश्नोई (रा. कोंढवा), घांसी (पूर्ण नाव माहिती नाही. रा. देहूगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मयूर दळवी यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Maval Loksabha Election 2024 : खासदार बारणे तीन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होतील – उदय सामंत 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी बाळगला असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास बिजलीनगर (Chinchwad) येथील गुरुद्वार चौकात कारवाई केली. या कारवाई मध्ये एक लाख 45 हजार 414 रुपयांचा गुटखा पोलिसांनी  (Chinchwad)जप्त केला. राजपूत याला पोलिसांनी अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.