Loksabha election 2024 : मावळत्या सूर्याच्या साक्षीने खोटी शपथ घेणाऱ्या नेत्यांना शिक्षा देण्याची हीच योग्य वेळ

पंतप्रधान मोदी यांची शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना शेतकरी हिताच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले.आज (दि.30 एप्रिल) रोजी मोदी यांची माढा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर(Loksabha election 2024) यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती.

 

Loksabha Election : महाराष्ट्रात एक अतृप्त आत्मा फिरतोय, पंतप्रधान मोदी यांची शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका

 

पंतप्रधान मोदी कालपासून महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी काल सोलापूर, सातारा आणि पुणे येथे महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या आणि त्या सर्व सभेला जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज मोदी माळशिरस येथून बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रातील एका मातब्बर नेत्याने 15 वर्षांपूर्वी शपथ घेतली होती की,माढ्यातील दुष्काळी भागाला पाणी देण्यात येईल पण त्यांनी त्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. मग अशा लोकांना तुम्ही शिक्षा देणार नाही का? त्यांना शिक्षा देण्याची हीच योग्य वेळ असून  महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन पंतप्रधानांनी जनतेला केले.

 

पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी पुण्यातील सभेत शरद पवारांचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा केला होता. त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीकेची तोफ(Loksabha election 2024) डागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.