Loksabha election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पिंपरी-चिंचवड येथे उद्या रोड शो

महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ रोड शो

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ उद्या (शनिवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पिंपरी- चिंचवड शहरात महा रोड शो होणार आहे. त्यानंतर महायुतीचे मावळ मतदारसंघातील अधिकृत उमेदवार बारणे यांच्या प्रचाराची(Loksabha election) सांगता होईल.

 

पिंपरी- चिंचवड येथील चापेकर चौकातून सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्र्यांच्या महा रोड शोचा प्रारंभ होईल.  चिंचवड गावातील पॉवर हाऊस चौक, लिंक रोड, तानाजी गावडे चौक, भाटनगर, इंदिरा गांधी उड्डाणपूल, शगुन चौक, साई चौक, गुरुद्वारा, जयहिंद स्कूल चौक, काळेवाडी नदी पूल, काळेवाडी रोड, पंचनाथ चौक, एम एम स्कूल, बीआरटी रोड, तापकीर चौक, रहाटणी चौक, काळेवाडी फाटा, बेलठीकानगर 16 नंबर, संतोष मंगल कार्यालय, गुजर नगर, वाकड रोड चौक या मार्गे डांगे चौक, असा महा रोड शोचा मार्ग असणार आहे. डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ महा रोड शोची सांगता होईल.

या महा रोड शोमध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर महायुतीचे काही वरिष्ठ नेते देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. या महा रोड शोमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर(Loksabha election) यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.