Loksabha Election : महाराष्ट्रात एक अतृप्त आत्मा फिरतोय, पंतप्रधान मोदी यांची शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका

पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार व राहुल गांधी यांच्यावर पुण्यातून डागली तोफ

एमपीसी न्यूज : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(शरदचंद्र पवार गट) आणि कॉंग्रेसचे राहुल गांधी यांच्यावर पुणे येथे आयोजित केलेल्या महासंकल्प विजयी सभेतून(Loksabha election) खरपूस समाचार घेतला.

 

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे जिल्हयातील चार  मतदारसंघातील (पुणे, मावळ, शिरूर आणि बारामती) महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची आज रेस कोर्स मैदानावर महासंकल्प विजयी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भोसरीचे आमदार महेश लांडगे, महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ(पुणे), सुनेत्रा पवार(बारामती), शिवाजीराव आढळराव पाटील(शिरूर), श्रीरंग बारणे (मावळ), महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आणि मोठ्या संख्येने नागरिक(Loksabha election) उपस्थित होते.

 

                 

 

या सभेतून बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, महाराष्ट्रातील एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर झाले आहे.  इथे काही भटके आत्मे आहेत. महाराष्ट्रातील एका अनुभवी नेत्याने हा खेळ 45 वर्षांपूर्वी सुरू केला. त्यानंतर अनेक मुख्यमंत्र्यांची पदे अस्थिर झाली. हे भटके आत्मे केवळ विरोधकांनाच अस्थिर करत नसून स्वतःच्या पक्षालाही अस्थिर केले आहे. या भटक्या आत्म्याने 1995 च्या आघाडी सरकारलाही अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता आणि 2019 मध्ये या आत्म्याने जनादेशाचा अपमान केला होता, असं म्हणत मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर टीकेची तोफ डागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.