Bopkhel : मामाच्या गावी आलेल्या भाच्याचा अपघात 

एमपीसी न्यूज – उन्हाळी सुट्ट्यांसाठी मामाच्या गावी आलेल्या ( Bopkhel ) भाच्याचा अपघात झाला. या अपघातात चार वर्षीय भाच्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना रविवारी (दि. 28) सकाळी 11 वाजताच्या सुमारास बोपखेल येथे घडली.

रिजवान शेख (वय 4, रा. धाराशिव) असे जखमी भाज्याचे नाव आहे.

Pune : पुणे तापले कमाल तापमान 43 अंशावर 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिजवान शेख हा तीन दिवसांपूर्वी उन्हाळी सुट्टीसाठी बोपखेल येथे मामा अकबर शेख यांच्याकडे आला होता. रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास तो बिस्किट आणण्यासाठी दुकानात गेला. त्यावेळी त्याला भरधाव डंपरने धडक दिली. यामध्ये रिजवान याच्या पायावरून डंपर गेला. या अपघातात रिजवान गंभीर जखमी झाला आहे. दिघी पोलीस तपास ( Bopkhel ) करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.