Pune : महंमदवाडी येथे एका भंगार मालाच्या गोडाऊनला आग

एमपीसी न्यूज –  महंमदवाडी येथे एका भंगार मालाच्या ( Pune) गोडाऊनला आज (सोमवारी) सकाळी आठच्या सुमारास आग लागली.  आग लागल्याची वर्दि नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून काळेबोराटे नगर, कोंढवा खुर्द येथून फायरगाडी व कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्र येथून वॉटर टँकर अशी एकुण तीन वाहने तातडीने रवाना करण्यात आला होता.

घटनास्थळी जवान पोहोचताच त्यांनी तिथे एका पञ्याचे बांधकाम असणाऱ्या भंगार मालाच्या गोडाऊनमध्ये आग लागून मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाल्याचे पाहताच सदर गोडाऊन हे बंद स्थितित असल्याने बोल्ड कटर हे उपकरण वापरत कुलूप तोडून जवानांनी आत प्रवेश करत फायर गाडीच्या साह्याने तत्परतेने पाण्याचा मारा करुन पंधरा मिनिटात आगीवर नियंञण मिळवले आणि इतरञ आग पसरु न देता धोका टाळला. या घटनेत कोणी ही जखमी वा जिवितहानी नसून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. सदर गोडाऊन लगत मोठ्या प्रमाणात कचरा ही पेटला होता.

Pune : पुणे तापले कमाल तापमान 43 अंशावर 

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी अनिल गायकवाड व वाहनचालक उत्कर्ष टिळेकर तसेच तांडेल महेंद्र कुलाळ, राहुल बांदल व फायरमन विजय चव्हाण, महेश फडतरे, संकेत शिंदे, परेश पवार, प्रसाद शिंदे, संतोष माने यांनी सहभाग ( Pune) घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.