Chinchwad : शहर पोलीस दलातील दामिनींचा रोडरोमिओंना ‘झटका’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टवाळखोर आणि हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना अद्दल घडविण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना केली आहे. शहर पोलीस दलात सध्या ३३ दामिनी कार्यरत असून यांच्याकडून महिला व मुलींना जलद गतीने प्रतिसाद दिला जात आहे. या पथकाने मागील काही महिन्यात शेकडो टवाळखोरांवर(Chinchwad) कारवाई केली आहे.

शाळा महाविद्यालयांच्या बाहेर काही हुल्लडबाज जाणीवपूर्वक घिरट्या(Chinchwad) घालत असतात. काहीजण मुलींची छेड काढण्यासाठी तर काहीजण चोरी करण्यासाठी घिरट्या घालतात. त्याचबरोबर शाळा महाविद्यालयांच्या बाहेर अंमली पदार्थ विक्रीसाठी देखील काहीजण आले असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवायांमधून समोर आले होते.

महिला व मुलींना सुरक्षित वातावरण देण्यासाठी शहर पोलीस दलात दामिनी पथक कार्यरत आहे. या पथकाने मागील काही महिन्यांत 150 टवाळखोरांवर कारवाई केली आहे. महिलांनी पोलिसांना संपर्क करताच दामिनी पथक त्या महिलेच्या मदतीसाठी पाठवले जाते. एक हजार 694 महिलांना या दामिनी पथकाने मागील काही महिन्यांत मदत केली आहे.

Chikhali : तडीपार गुंडाला पिस्तूलसह अटक

शाळा, महाविद्यालय परिसरात तसेच रस्त्याने जाताना काही अडचण आल्यास विद्यार्थिनी देखील पोलिसांना संपर्क करतात. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये संबंधित पोलिसांचे संपर्क क्रमांक तसेच पोलीस नियंत्रण कक्षाचे क्रमांक दिले आहेत. त्यानुसार अडचणीच्या काळात विद्यार्थिनी देखील पोलिसांची मदत घेतात. दामिनी पथकाने 27 विद्यार्थिनींच्या तक्रारींचे निवारण केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.