Chikhali : तडीपार गुंडाला पिस्तूलसह अटक

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुंडाला दोन पिस्तूलसह अटक(Chikhali) करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (दि. 27) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास साने चौक, चिखली येथे करण्यात आली.

 

तुषार गौतम झेंडे (वय 26, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे(Chikhali) नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सचिन मोरे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुषार झेंडे हा निगडी आणि पिंपरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी 23 ऑगस्ट 2022 रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. तसेच त्याने स्वतःकडे बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगले.

 

याबाबत गुन्हे शाखा युनिट एकला माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकने तुषार झेंडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 40 हजार रुपये किमतीचे दोन देशी पिस्तूल आणि चार हजार रुपये किमतीची चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

Talegaon : मेफेड्रॉन विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

 

ही उत्कृष्ट  कामगिरी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक गोरख कुंभार,उपनिरीक्षक शिवाजी कानडे,पोलीस अंमलदार सचिन मोरे,अमित खानविलकर,बाळू कोकाटे, फारुख मुल्ला, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, उमाकांत सरवदे, स्वप्नील महाले, अजित रुपनवर, विशाल भोईर, मारुती जायभाये, तानाजी पानसरे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.