Akurdi : पीसीसीओई मध्ये राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेला प्रारंभ

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र अँमॅच्युअर नेटबॉल संघटनेच्या मान्यतेने, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी, पुणे जिल्हा नेटबॉल संघटना व विठ्ठलशेठ सोमाजी काळभोर चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 27 ते 29 एप्रिल या कालावधीत 17 वी वरिष्ठ गट (पुरुष व महिला) राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेचे आयोजन पीसीसीओई मैदानावर(Akurdi) करण्यात आले आहे. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील 25 पुरुष संघ व 20 महिला संघानी सहभाग नोंदविला आहे.

 

या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र अँमॅच्युअर नेटबॉल संघटनेचे सचिव डॉ. ललित जीवानी, पुणे जिल्हा नेटबॉल संघटनेचे सचिव मानसिंग वाबळे, विठ्ठलशेठ सोमाजी काळभोर चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष हरिश्चंद्र काळभोर, सचिव गोरख भालेकर, कोषाध्यक्ष चेतन काळभोर, साहिर सिकीलकर आदी उपस्थित होते.

प्रथमच पीसीसीओईला राज्यस्तरीय स्पर्धा (Akurdi) आयोजनाचा मान मिळाला आहे. स्पर्धा साखळी व बाद पद्धतीत होणार आहेत. पहिल्या दिवशीच्या साखळी सामन्यात पुणे, गोंदिया, शाहूनगर, भंडारा पुरुष संघानी पाहिले सामने जिंकून पुढे आगेकूच केली.

 

PCET : कॅलिफोर्नियाच्या एसएइ एरो डिझाईन वेस्ट स्पर्धेत पीसीसीओईचे नेत्रदीपक यश

 

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे,उपाध्यक्षा पद्माताई भोसले,सचिव विठ्ठल काळभोर,खजिनदार शांताराम गराडे,विश्वस्त हर्षवर्धन पाटील,उद्योजक नरेंद्र लांडगे,अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी आयोजकांना आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन व स्पर्धेचे आयोजन पीसीसीओईचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष पाचारणे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.