Pimpri : दारूची वाहतूक करणाऱ्यावर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज – दारूची वाहतूक केल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या ई (पिंपरी-चिंचवड) विभागाकडून एका रिक्षावर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल(Pimpri) करण्यात आला आहे.

उमेश शामराव कालुंके (वय 35, रा. काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Chinchwad : शहर पोलीस दलातील दामिनींचा रोडरोमिओंना ‘झटका’

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू धंद्यांवर कारवाई केली जात आहे. पिंपरी-चिंचवड विभागाने पिंपरी मधील गांधीनगर – नेहरूनगर रस्त्यावर कारवाई करून एक रिक्षा ताब्यात घेतली. रिक्षामध्ये गावठी दारूने भरलेले सहा कॅन होते. रिक्षातून 290 लिटर गावठी दारू तसेच रिक्षासह 81 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल(Pimpri) जप्त करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.