Today’s Horoscope 29 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 29 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – सोमवार.

तारीख – 29.04.2024.

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष – सामान्य दिवस.

राहू काळ – सकाळी 7.30 ते 09.00.

दिशा शूल – पूर्वेला असेल.

आज नक्षत्र – पूर्वाशाढा नक्षत्र.

चंद्र राशी – धनु

—————————–

मेष ( शुभ रंग- राखाडी)

आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल. सज्जनांचा सहवास लाभेल. सरकारी कामे मात्र रखडतील. गृहिणी आज दानधर्म करतील.

वृषभ (शुभ रंग- चंदेरी )

आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. विश्वासातील व्यक्तींकडूनच विश्वासघात होऊ शकतो. कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. स्वतःला जपा.

मिथुन (शुभ रंग – पांढरा)

कुटुंबीयात सामंजस्य  असल्याने तुमचे मनोबल ही उत्तम असेल. आज जोडीदाराचे हट्ट पुरवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. संध्याकाळी कामावरून येताना गाडी जपून चालवा.

कर्क ( शुभ रंग- गुलाबी) 

कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमच्या प्रयत्नांना दैवाचे पाठबळ नक्की मिळेल. येणी असतील तर दिवसाच्या उत्तरार्धात वसूल होण्याची शक्यता आहे.

सिंह ( शुभ रंग- डाळिंबी)

हौशी मंडळी जीवाची मुंबई करतील. आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी वेळ व पैसाही खर्च कराल. गुढशास्त्राच्या अभ्यासकांना एखादी प्रचिती येईल.

कन्या (शुभ रंग- जांभळा)

आज काही घरगुती प्रश्नांत लक्ष घालणे तुम्हाला गरजेचे वाटेल. मुलांच्या अभ्यासातही डोकवण्याची आवश्यकता आहे. आज गृह उद्योग करणाऱ्या महिलांची आवक वाढेल.

तूळ (शुभ रंग- लाल)

नोकरदारांना बढती बदली विषयी समाचार येऊ शकतात. मुले आज अभ्यासात चालढकल करतील. गृहिणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा अजिबात करू नये.

वृश्चिक ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी) 

आज खिशात पैसा खेळता असल्याने आनंदी व उत्साही असाल. काही हवे हवे असे वाटणारे पाहुणे घरी पाय धुळ झाडतील. आज खरे बोलण्यापेक्षा गोड बोलणेच हिताचे राहील.

धनु (शुभ रंग- आकाशी)

आज स्वतःचेच खरे करू नका. इतरांचंही ऐकून घेणे गरजेचे आहे. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. गोडबोल्या मंडळींचे गोड बोलणे फार मनावर घेऊ नका.

मकर (शुभ रंग- सोनेरी)

आज दिवस खर्चाचा आहे, बचतीचा विचारच सोडून द्या. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. आज गरजेपुरते तुम्ही अध्यात्मकही व्हाल प्रवासाचा आनंद लुटाल.

कुंभ ( शुभ रंग- मरून)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस जे जे चिंताल ते ते होईल. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. संध्याकाळी अनपेक्षित खर्च उद्भवेल.

मीन ( शुभ रंग- हिरवा)

आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्याला प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. संध्याकाळी सहकुटुंब मौज मजेस प्राधान्य द्याल.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 

9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.