Chinchwad : अल्पवयीन वाहनचालक वाहतूक पोलिसांच्या रडारवर

विशेष मोहिमेत 571 अल्पवयीन वाहन चालक आणि मालकांवर कारवाई

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन चालवण्याचा परवाना नसताना वाहने दिल्याने अपघाताचा धोका वाढतो. परिणामी मुलांच्या भविष्यावर गंभीर परिणाम होतो. मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तसेच अपघातांची संख्या कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अल्पवयीन वाहन चालक आणि त्यांना वाहन चालवण्यासाठी देणारे वाहन मालक यांच्यावर 6 ते 12 एप्रिल या कालावधीत 571 कारवाया करण्यात आल्या आहेत. तर विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या 677 जणांवर कारवाया केल्या आहेत.

16 वर्षांखालील मुलांकडे वाहन चालवण्याचा परवाना नसताना देखील त्याला वाहन चालवण्यास देणे आता पालकांना आणि वाहन मालकांना महागात पडणार आहे. वाहतूक पोलिसांकडून (Chinchwad) आता कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे अल्पवयीन वाहन चालक वाहतूक पोलिसांच्या रडारवर आले आहेत. 6 ते 12 एप्रिल या कालावधीत राबवलेल्या विशेष मोहिमेत 571 जणांवर कारवाई करून त्यांच्यावर ४१ लाख 40 हजार एवढा दंड आकारण्यात आला आहे.

Chikhali : मौजमजेसाठी अल्पवयीन मुले करायची वाहनचोरी; चोरीची सात वाहने जप्त

तसेच विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांमुळे देखील अपघातांची शक्यता वाढते. त्याबाबत देखील वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेष मोहिमेत एका आठवड्यात वाहतूक पोलिसांनी 677 वाहन चालकांवर कारवाई केली आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालवल्या प्रकरणी निगडी वाहतूक विभागात सर्वाधिक 124 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून त्यांच्यावर होणारी दंडात्मक आणि न्यायालयीन कारवाई टाळावी, असे आवाहन (Chinchwad) वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.