Chikhali : मौजमजेसाठी अल्पवयीन मुले करायची वाहनचोरी; चोरीची सात वाहने जप्त

एमपीसी न्यूज – तीन अल्पवयीन मुले मौजमजेसाठी दुचाकी वाहने चोरी करत असल्याचा प्रकार उघडकीस(Chikhali) आला आहे. चिखली पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सात दुचाकी वाहने जप्त केली आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरेवस्ती, साने चौक, (Chikhali)टॉवर लाईन, कुदळवाडी, चिखली हा दाट लोकवस्तीचा भाग आहे. इथे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग वास्तव्यास आहे. वाहनांच्या पार्किंगला जागा नसल्याने रस्त्याच्या बाजूला मिळेल त्या ठिकाणी नागरिक आपली वाहने पार्क करतात. याचा गैरफायदा काहीजण घेत असून रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढते.

शुक्रवारी (दि. 12) चिखली पोलिसांना गस्त घालत असताना तिघेजण एका दुचाकीवरून संशयितपणे जाताना दिसले. पोलिसांना पाहून ते पळून जात होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौबाशी केली असता ती दुचाकी त्यांनी चिखली परिसरातून चोरी केल्याचे निदर्शनास आले.

Dehu : गावच्या यात्रेत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उपक्रम

पोलिसांनी तिन्ही मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांना बोलावून घेण्यात आले. पालकांसमोर मुलांकडे चौकशी केली असता त्यांनी आणखी सहा दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी तिन्ही मुलांकडून सात दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यातील सहा दुचाकिंबाबत माहिती मिळाली असून एमएच 14/ईएक्स 2280 या दुचाकीबाबत पोलीस शोध घेत आहेत.

मुलांनी मौजमजा करण्यासाठी दुचाकी वाहने चोरी केल्याचे सांगितले आहे. त्यांनी ठाणे शहरातील डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून देखील एक दुचाकी चोरी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.