BCCI : टी-20 क्रिकेट विश्वकपसाठी भारतीय संघाची घोषणा; शिवम दुबे इन तर रोहित शर्मा कर्णधार म्हणून कायम

शुभमन गिल, खलील अहमद, रिंकू सिंह, आवेश खान यांची राखीव खेळाडू म्हणून निवड

एमपीसी न्यूज : T-20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघाची घोषणा आज(दि.30 एप्रिल) रोजी करण्यात आली असून शिवम दुबे याला संघात जागा मिळाली असून शुभमन गिल, खलील अहमद, रिंकू सिंह, आवेश खान यांना राखीव खेळाडू(BCCI) म्हणून घेण्यात आले आहे.

 

टी-20 विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये 2 ते 29 जून दरम्यान खेळवला जाणार असून  भारताचा पहिला सामना  5 जूनला आयर्लंडविरुद्ध आहे.यावेळी टी-20 विश्वचषकाची 9 वी आवृत्ती खेळवली जाणार आहे. या  टी-20 विश्वचषक भारताचे चार साखळी सामने होणार असून क्रिकेट जगताचे सर्वात जास्त लक्ष  असलेली लढत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना 9 जून रोजी होणार असून हा सामना(BCCI) कोण जिंकेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेन.

 

टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी निवडण्यात आलेली भारतीय टीम अशी –

रोहित शर्मा (कर्णधार)हार्दिक पंड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, विराट कोहली,  शिवम दुबे, संजू सॅमसन,अक्षर पटेल,रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू- शुभमन गिल, खलील अहमद, रिंकू सिंह, आवेश खान.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.