Moshi : लुटमार करणाऱ्या चोराला चालकानेच केले पोलिसांच्या हवाली

एमपीसी न्यूज –  गाडी चालकाला अडवून लुटमारी करणाऱ्या चोराला चालकानेच पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. ही घटना सोमवारी (दि.29) देहू रस्ता, मोशी येथे घडली आहे.

 

जगदीश सुखराम सिंह (वय 40 रा.मोशी) यांनी एमयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली आहे. यावर बाबा तालेल्ला इराणी (वय 55 रा. शिवाजीनगर,पुणे) याला अटक केली असून त्याचा साथीदार अली सरू इराणी (वय 30 रा.हडपसर) याच्यावर गुन्हा(Moshi) दाखल केला आहे.

 

Vadgaon : पाहिल्याच्या रागातून एकावर तलवारीने वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपींनी फिर्यादीला दमदाटी करून फिर्यादी यांच्याकडून 19 हजार 500 रुपये हिसकावून घेतले.फिर्यादी यांनी पाठलाग करून एका आरोपीला पकडले . दुसरा साथीदार 10 हजार 500 रुपये घेऊन पळून(Moshi) गेला. फिर्यादी यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले.एमयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.