Pimpri : पिंपरी मध्ये हवाई दलाचा ट्रक पलटी 

एमपीसी न्यूज – पिंपरी मधील मोरवाडी येथे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर (Pimpri)हवाई दलाचा ट्रक पलटी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 30) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हवाई दलाचा ट्रक पुण्याहून निगडीच्या(Pimpri) दिशेने जात होता. मोरवाडी येथे आल्यानंतर ट्रक समोर अचानक दुचाकी आली. दुचाकीला वाचवण्यासाठी चालकाने ट्रक वळवला असता ट्रक पलटी झाला. ट्रक मधील ऑइल रस्त्यावर सांडले. तसेच पुणे मुंबई मार्गावर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.

Pimple Gurav : पिंपळे गुरवमध्ये सामुदायिक व्रतबंध सोहळा उत्साहात

घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस तसेच वाहतूक विभागाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक पोलिसांनी खराळवाडी येथून महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्याने वळवली. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला ट्रक बाजूला केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.