Pune : आझम कॅम्पसचे मिरवणुकीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस)च्या(Pune) वतीने भारतरत्न  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणुक काढण्यात आली.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसेच डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार (Pune)यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. 14) सकाळी साधू वासवानी चौकातून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.

 

Chakan: राष्ट्रवादी प्रवेशानंतर अतुल देशमुख यांचे कार्यकर्त्यांकडून स्वागत

संस्थेचे सचिव प्रा .इरफान शेख, डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एम. डी. लॉरेन्स, शाहिद इनामदार, एस ए इनामदार, शाबिर शेख, रशीद चीनिवार, वाहिद बियाबानी, आसिफ शेख, बबलू सय्यद, युसूफ शेख, विश्वस्त, मुख्याध्यापक, प्राचार्य, पदाधिकारी, कर्मचारी आणि दोन हजार विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले.

मिरवणुकीत अल्पसंख्य समुदायातील विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय होते. ठिकठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी या अभिवादन मिरवणुकीचे स्वागत केले. दरवर्षी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात. हजारो विद्यार्थी  त्यात सहभागी होतात. त्यातून महामानवांचे सामाजिक, शैक्षणिक संदेशांचा प्रसार केला जातो.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.