Loksabha Election :खासदार बारणे यांच्या प्रचारासाठी आज संध्याकाळी पाच वाजता आठवले यांची पिंपरी येथे सभा

जनतेने मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहावे असे आवाहन

एमपीसी न्यूज- मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय- मनसे- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज (दि.1 मे) रोजी पिंपरी येथे जाहीर सभा घेणार(Loksabha Election) आहेत.

 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारील मैदानावर आज संध्याकाळी पाच वाजता आठवले यांची सभा होणार आहे. या सभेला महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

 

Maval LokSabha Elections 2024 : मावळात महायुतीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या कामाची नोंद घेणार ‘टीम नमो’

 

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे व शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर तसेच रिपब्लिकन पक्षाच्या(Loksabha Election) सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.