Today’s Horoscope 1 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 1 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

आजचे पंचांग
आजचा दिवस – बुधवार.
तारीख – 01.05.2024.
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – महाराष्ट्र दिन.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30 पर्यंत.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र – श्रवण नक्षत्र.
चंद्र राशी – मकर.
—————————–
मेष- ( शुभ रंग- हिरवा)
तरुण मंडळी ध्येय प्राप्तीच्या दिशेने वाटचाल करतील. अधिकारी वर्गाला अधिकार वापरावेच लागणार आहेत. आज फक्त कर्तव्यास प्राधान्य देणे गरजेचे राहील.

 

वृषभ (शुभ रंग- चंदेरी)
कार्यक्षेत्रात आज काही किरकोळ अडचणींचा सामना तुम्ही यशस्वीपणे कराल. संध्याकाळी सज्जन मंडळींच्या सहवासात चांगली वैचारिक देवाण घेवाण होईल.

 

मिथुन (शुभ रंग – सोनेरी)
आज आर्थिक व्यवहार मर्यादेबाहेर नकोत. गोडबोल्या मंडळींपासून दूरच रहा. सासुरवाडी कडून एखादा लाभ होऊ शकतो. आज कोणतीही धाडसाची कामे टाळा.

 

कर्क ( शुभ रंग- पिस्ता) 
कौटुंबिक जीवनात सामंजस्य असल्याने तुम्ही घराबाहेर आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. समोर येणारी प्रत्येक व्यक्ती आज तुमच्या प्रभावात राहील.

 

सिंह ( शुभ रंग- डाळिंबी)

क्षुल्लक वाटणाऱ्या कामातही ऐनवेळी काही अडचणी उभ्या राहतील. ध्येयप्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ मात्र नक्की मिळेल.

 

कन्या (शुभ रंग- गुलाबी)
कलाक्षेत्रातील मंडळींना रसिक मनसोक्त दाद देतील. तरुण मंडळींच्या महत्त्वाकांक्षा वाढतील. आज स्वतःचे छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसाही तुम्ही खर्च कराल.

 

तूळ (शुभ रंग- आकाशी)
आज गृहिणी घर स्वच्छतेचे मनावरच घेतील. काहीजण सहकुटुंब प्रवासाला निघतील. आज प्रवासात नवे हितसंबंध जुळतील. वाणीत मात्र गोडवा असू द्या.

 

वृश्चिक ( शुभ रंग- जांभळा) 
एखाद्या महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा तुमचा प्रयत्न असेल. आज तुमची आर्थिक बाजूही भक्कम राहील.

 

धनु (शुभ रंग- क्रीम)
अत्यंत उत्साहाने व सकारात्मकतेने  आज घराबाहेर पडाल. काही येणी आज अनपेक्षित रित्या वसूल होतील. आज विरोधकही  मैत्रीचा हात पुढे करतील. काही कारणाने शेजारी रुसतील.

 

मकर (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुम्ही काहीसे हट्टीपणाने वागाल तुम्हाला इतरांची मते पटणार नाहीत. महत्त्वाच्या वाटाघाटी दिवसाच्या उत्तरार्धात केल्यास यशस्वी होतील. आज प्रवास कार्य साधक होतील.

 

कुंभ ( शुभ रंग- पांढरा)
महत्त्वाची कामे आज दुपार पूर्वी उरकून घेतलेली बरी. कौटुंबिक वाढत्या गरजा भागवताना थोडीफार तारेवरची कसरत होईल. गृहिणींना पूर्वी केलेली बचत कामी येईल.

 

मीन ( शुभ रंग- मोतिया)
सकारात्मक राहून व कर्तव्याला प्राधान्य देऊन आजचा दिवस सत्कारणी लावाल. आज दुपारनंतर एखादा अपेक्षित लाभ संभवतो. आज म्हणाल ती पूर्व असेल.

 

शुभम भवतु
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 
9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.