Talegaon Dabhade :  मेगा जॉब फेअरमध्ये इंद्रायणी डी फार्मसीच्या 19 विद्यार्थ्यांची निवड

एमपीसी न्यूज – नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशनच्या पुढाकाराने डी. फार्म मेगा जॉब फेअरचे (Talegaon Dabhade)आयोजन करण्यात आले. या मेगा जॉब फेअरमध्ये  तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीच्या डी. फार्मसी अंतिम वर्षाच्या 19  विद्यार्थ्यांची मेडप्लस या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळवणारे ही एकमेव संस्था ठरली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. जी. एस. शिंदे यांनी दिली.

 

या मेगा जॉब फेअर मध्ये मोठ्या प्रमाणात डी.फार्मसीच्या क्षेत्रातील शेकडो विद्यार्थ्यांना (Talegaon Dabhade)रोजगार उपलब्ध झाले. या मेगा जॉब फेअर ला इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी तळेगाव दाभाडे च्या महाविद्यालयाच्या डी. फार्मसी अंतिम वर्षाच्या 19 विद्यार्थ्यांची मेडप्लस या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली. मुख्यता: 50 पेक्षा जास्त महाविद्यालयाच्या सहभाग असूनही इंद्रायणी फार्मसी महाविद्यालयाने इतक्या मोठ्या प्रमाणात यश संपादन केले.

 

Pune: वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी, चांदणी चौक प्रकल्प ठरेल पथदर्शी – मुरलीधर मोहोळ 

 

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रामदास आप्पा काकडे, संस्थेचे कार्यवाह मा. श्री. चंद्रकांत शेटे, संस्थेच्या मार्गदर्शिका सदस्या सौ. निरूपा कानिटकर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. जी. एस. शिंदे, संस्थेचे इतर विश्वस्त, प्रशिक्षण आणि निवड अधिकारी प्रा. श्री. मयूर लोहकरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग आदींनी कौतुक केले.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.