Wakad: भरधाव ट्रकची डिव्हायडरला धडक 

एमपीसी न्यूज – भरधाव ट्रकने डिव्हायडरला धडक दिली. त्यात लोखंडी डिव्हायडर,(Wakad) पोल आणि स्ट्रीट लाईटचे नुकसान झाले. याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 29) सकाळी साडेसहा वाजता सांगवी फाटा ते वाय जंक्शन वाकड या मार्गावर घडली.
अंकुश महादू बंदुके (वय 32, रा. कुरकुंभ, ता. दौंड) असे गुन्हा दाखल झालेल्या (Wakad)ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी महापालिकेचे कनिष्ठ विद्युत अभियंता गिरीधर कोरे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Pune: पवना सहकारी बँकेची खास शिक्षक कर्ज योजना, 9.75टक्के व्याजदराने कर्ज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश बंदुके त्याच्या ताब्यातील ट्रक (एमएच 32/एजे 5873) सांगवी फाटा येथून वाकड येथील वाय जंक्शनकडे जात होता. त्याने ट्रक हयगयीने चालवून डिव्हायडरला धडक दिली. त्यात लोखंडी डिव्हायडर, सिमेंटचा कठडा, पोल आणि स्ट्रीट लाईटचे नुकसान झाले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.