Loksabha Election : _ _ हा तर प्रायोजित कार्यक्रम – पंकजा मुंडे

प्रचारासाठी माजलगाव येथे गेल्यानंतर पंकजा मुंडे यांचा ताफा रोखला

एमपीसी न्यूज : माझी गाडी अडवून घोषणा देणारे मराठा आंदोलक नव्हते तर हा एक प्रायोजित कार्यक्रम होता असा हल्लाबोल बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकज मुंडे(Loksabha Election) यांनी केला.

 

याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे काल(दि.29) रोजी माजलगाव तालुक्यात प्रचारासाठी गेल्यानंतर यांच्या गाडीचा ताफा तब्बल दोन ठिकाणी मराठा आंदोलकांनी अडविला होता. याविषयी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्याच गाडीचा ताफा का अडविला जातोय? बीड जिल्ह्यामध्ये 40 उमेदवार फिरत असताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर माझीच का अडवणूक केली जातेय? जेव्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरून माझा ताफा अडविला जातो तेव्हा 14-15 वर्षांची मुले असतात, त्या मुलांना पाहून मी खूप भावनिक होते. कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा माझ्याविरोधात जे राजकारणी नेते आहेत त्यांनी मुलांमध्ये जातीपातीची लढाई निर्माण होईल(Loksabha Election) असे वागू नये.

 

Loksabha election 2024 : मावळत्या सूर्याच्या साक्षीने खोटी शपथ घेणाऱ्या नेत्यांना शिक्षा देण्याची हीच योग्य वेळ

यावेळेस माझा ताफा दुसऱ्यांदा अडवण्यात आला असून तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आहे. पण माझे ठाम मत आहे की, माझा ताफा अडवण्याचा झालेला प्रकार मराठा आंदोलकांनी केलेला नसून तिऱ्हाईत लोकांनी केला असावा. याचे प्रमुख कारण म्हणजे आंदोलक हे नेहमी चर्चा करण्यासाठी तयार असतात.त्यामुळे हा कार्यक्रम प्रायोजित होता याची शक्यता नाकारता येत नाही. मी कोणत्याही समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे कधीच वागत नाही. मराठा समाजाला कोर्टात टिकणारे आरक्षण मिळेल,असा शब्द मी मराठा बांधवांना दिला आहे तरी पण हे प्रकार माझ्या बाबतीत नेहमीच होत आहेत त्यामुळे मला अत्यंत वाईट वाटते.

बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजा मुंडे यांची लढत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात होत असून मतदार कोणाला पसंती देतात हे आपल्याला मतदान मोजणीच्या दिवशीच म्हणजे 4 जूनला समजेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.