Wakad : मनी लॉन्ड्रींगची भीती घालून आयटी अभियंत्याला 12 लाखांचा ऑनलाईन गंडा

एमपीसी न्यूज – आयटी अभियंत्याला स्काईपवर अकाउंट उघडण्यास सांगत तुमच्या नावावर मनी लॉन्ड्रींग सुरु असल्याचा बहाणा करून गोपनीय माहिती घेतली. त्याआधारे बँक खात्यातून 12 लाख रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. ही घटना 21 आणि 22 एप्रिल रोजी रहाटणी येथे घडली.

 

याप्रकरणी आयटी अभियंत्याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात(Wakad) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Wakad : शिवीगाळ करताना हटकले म्हणून कॅब चालकाला मारहाण

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीस फोन करून त्यांना स्काईप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यावर आयडी बनवण्यास सांगून आरोपींनी त्यांना स्काईपवर जॉईन करून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांच्या नावावर लखनऊ येथे मनी लॉन्ड्रींग सुरु असल्याचा बहाणा केला. त्यानंतर फिर्यादीकडून आधार कार्ड,डेबिट कार्डसहित बँकिंग डीटेल्स घेतले. राष्ट्रीय गोपनीयता कायद्यानुसार फिर्यादीस हा प्रकार कोणालाही सांगता येणार नाही, असेही आरोपींनी सांगितले. दरम्यान, आरोपींनी फिर्यादीच्या खात्यातून 12 लाख रुपये ट्रान्सफर करून घेत त्यांची(Wakad) फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.