Wakad : शिवीगाळ करताना हटकले म्हणून कॅब चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – रस्त्यावर उभा राहून आरोपी शिवीगाळ करत होते.यावेळी हटकले म्हणून  कॅब चालकाला मारहाण केली आहे.ही घटना ताथवडे येथे रविवारी (दि.28) घडली आहे. 

 

आकाश साईबाबा सोनकडे (वय23 रा.ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सागर लक्ष्मण पवार(वय 30), सहील संदीप पवार (वय 30) यांच्यावर गुन्हा दाखल(Wakad) केला आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कॅब चालक असून ते गाडीतून जात असताना आरोपी हे रस्त्यावर शिवीगाळ करत थांबले होते. फिर्यादीने त्यांना शिवीगाळ का करता असे हटकले म्हणून त्यांनी फिर्यादीला खाली पाडून बेदम मारहाण(Wakad) केली आहे. यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.