Panvel : बारणे यांच्या पनवेलमधील बाईक रॅली व कामोठेतील जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद

एमपीसी न्यूज –  मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ नवीन पनवेल, खारघर व कामोठे या परिसरात काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला तसेच रात्री कामोठे येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने उंच भरारी घेतली असल्यामुळे त्यांनाच पुन्हा पंतप्रधान करणे आवश्यक आहे, असे आवाहन बारणे(Panvel) यांनी यावेळी केले.

बाईक रॅलीमध्ये शेकडे तरुण महायुतीतील आपापल्या पक्षाचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. रॅलीमधील विजया रथावर खासदार बारणे, यांच्या आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष ‌अविनाश कोळी यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी(Panvel) उपस्थित होते.

*बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद*

चौका-चौकात फटाके वाजवून, पुष्पवृष्टीमध्ये सुवासिनींकडून औक्षण करण्यात येत होते. मोदींचा मुखवटा परिधान केलेल्या युवकही रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीमध्ये रिक्षाचालकांचा सहभाग ही उल्लेखनीय होता. काही तरुण-तरुणींनी कोळी नृत्य सादर करीत बारणे यांचे जोरदार स्वप्न रस्त्याच्या दुतर्फा जमा झालेल्या जनसमुदायाला बारणे यांनी अभिवादन केले व मतदारांचे आशीर्वाद घेतले.

 

रॅलीची सांगता कामोठे येथे जाहीर प्रचार सभेने झाली. व्यासपीठावर खासदार बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपाचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे तसेच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर दिवंगत ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील हेही व्यासपीठावर उपस्थित होते.

*बारणे यांनी वाचला विकास कामांचा पाढा*

या सभेत खासदार बारणे यांनी गेल्या दहा वर्षांत केलेली विकास कामे, संसदेतील कामगिरी याची माहिती दिली. विरोधकांकडे प्रचारासाठी मुद्दे नाहीत, त्यांनी कोणतेही काम केलेले नाही. त्यामुळे केवळ आरोप-प्रत्यारोप करण्यापलीकडे ते काहीही करत नाहीत, अशी टीका बारणे यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व क्षेत्रांमध्ये गेल्या दहा वर्षात मोठी भरारी मारली आहे. भारत अगदी चंद्रावर जाऊन पोहोचला आहे. सर्वच क्षेत्रात भारताची कामगिरी उल्लेखनीय आहे, याकडे बारणे यांनी लक्ष वेधले. दुर्गम अशा आदिवासी वाड्या वस्त्यांवर वीजपुरवठा आणि रस्त्यांचे काम केल्याचेही बारणे यांनी सांगितले. नवी मुंबई- पनवेल येथे होत असलेल्या विमानतळाला दिवा पाटील यांचेच नाव देण्यात येईल याचा बारणे यांनी पुनरुच्चार केला.

Maval Loksabha Election : ‘जो राम को लाये है, हम उनको लायेंगे’ च्या घोषणांमध्ये उत्तर भारतीयांचा बारणे यांना पाठिंबा

*दक्षिण भारतीयांचा पाठिंबा*

कामोठे येथील सभेपूर्वी न्यू पनवेल ईस्ट भागात झालेल्या दक्षिण भारतीय समाज संमेलनात महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना एकमताने पाठिंबा जाहीर करण्यात आला. मेळाव्याचे आयोजन पनवेल महापालिकेचे माझी स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी केले होते.‌ या कार्यक्रमाला शहरातील दक्षिण भारतीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.‌

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.