Chinchwad : राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत नृत्य कला मंदिरच्या संघाला पारितोषिक

एमपीसी न्यूज – जागतिक नृत्य दिनानिमित्त नृत्य कला मंदिर या संस्थेमार्फत घेतल्या गेलेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत निगडी येथील नृत्य कला मंदिरच्या विद्यार्थिनींच्या समूह नृत्याला प्रथम क्रमांक(Chinchwad) मिळाला. लायन्स इंटरनॅशनल, महाराष्ट्र एकता अभियान, बी द चेंज व प्रतिभा कॉलेज यांच्या सहकार्याने या स्पर्धा घेण्यात आल्या. 

 

यावेळी तेजश्री अडिगे, बी एल जोशी, अनिकेत काळोखे, नंदकुमार काळोखे, बॉलीवूडचे नृत्य दिग्दर्शक जिवेंद्र गुजराती आदी यावेळी उपस्थित होते.

 

तेजश्री अडिगे म्हणाल्या, ‘जो वेळ पाळतो तो यशस्वी होतो. कलाकारांना व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. प्रत्येक नृत्याचे वेगळे वैशिष्ट्य असते. त्याच्या आधारे जन्म मजेत घालवा. गावागावात लोकनृत्य जायला हवे. आत्तापर्यंत मी 12 हजार विद्यार्थ्यांना नृत्य(Chinchwad) शिकवले आहे.

 

जिवेंद्र गुजराथी म्हणाले, ‘अशा प्रकारच्या स्पर्धांमधूनच पुढे मोठे कलाकार घडत असतात. तुम्ही हे करियर म्हणून गांभीर्याने घ्या. तुमच्याकडे बुद्धी व कौशल्य असेल तर तुम्ही जग जिंकू शकता.

 

वैष्णवी शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. सायली पवार व रंजना ओसवाल यांनी परीक्षण केले. वीणा भोसले, संस्कृती मगदूम, तन्वी एकदारी, सुप्रिया धाईंजे, विदुल्लता खत्री, संजीवनी खत्री यांनी संयोजनात सहकार्य केले.

 

प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाचे स्पर्धक –

 

सोलो – ऋतुजा गोखले
डुएट – सानिका आणि ऋतिका

 

लोकनृत्य स्पर्धा

5 ते 12 वर्ष वयोगट
सोलो – सायली सांगवे
समूह नृत्य – विस्टनर

 

13 ते 20 वयोगट
सोलो – हिमानी पुराणिक
समूह नृत्य – एस डी ए ग्रुप

 

21 ते 40 या वयोगटा
सोलो – स्वाती बालवीर
डुएट – समृद्धी भोसले

 

बॉलीवूड नृत्य प्रकार
5 ते 12 वर्ष वयोगट – वंशिका
समूह नृत्य – सूर्यनमस्कार ग्रुप

 

13 ते 20 वयोगट -सिद्धिविनायक व रोहित
समूह नृत्य – डी डब्ल्यू एन ग्रुप
सोलो – तन्मय सावळे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.