Pimpri : प्रतिभा महाविद्यालयात शारदीय महोत्सव जल्लोषात साजरा

एमपीसी न्यूज – कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा कनिष्ठ (Pimpri) महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदोत्सवानिमित्त गरभा नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. वनिता कुर्‍हाडे आणि सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. वनिता कुर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागा अंतर्गत प्रा. वर्षा निगाडे व प्रा. तृप्ती बजाज यांच्या पुढाकाराने व सर्व प्राध्यापकांच्या मदतीने ‘गरभा नृत्य स्पर्धा’ अतिशय उत्साहात पार पडल्या.

Talegaon Dabhade : नियमित वैद्यकीय तपासणी उत्तम आरोग्यासाठी लाभदायी – रो. विलास काळोखे 

इयत्ता अकरावी व बारावी वर्गानुसार गट पाडले होते. त्यानुसार प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून क्षितिजा मेहेर, सायली सोनावने, संकेत साकोरे आणि दिव्या नायर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. एकूण अठरा गटातून प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले.

प्रथम क्रमांक- बारावी सायन्स, द्वितीय क्रमांक-बारावी कॉमर्स तर अकरावी सायन्स तुकडी ‘इ’ चा तृतीय क्रमांक देऊन विजेत्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच युगुल (ड्यूएट) नृत्याचे ही वेगळी पारितोषिके देण्यात आली.

त्यामध्ये बारावी सायन्स मधून स्वराली पन्हाळे व अनिकेत कदम यांना महाविद्यालयाची रोलर ट्रॉफी, बारावी कॉमर्स मधून अनुशा दहीभाते व सतीश यांना प्रथम क्रमांक तर बारावी आर्टस् मधून प्रणय पनीकर व ऑरेंल फारमेर या जोडीला द्वितीय पारितोषिक मिळाले.

अशा प्रकारे पारितोषिके देऊन विजेत्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे औपचारिक सूत्रसंचालन प्रा.अर्चना भट्टाचार्य व सुकन्या बॅनर्जी यांनी केले तर; विद्यार्थी व विद्यार्थिनींनी स्पर्धेचे सूत्रसंचलन मनोरंजनात्मक पद्धतीने केले. तसेच आभार प्रदर्शन प्रा. वर्षा निगडे यांनी (Pimpri) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.