Talegaon Dabhade : नियमित वैद्यकीय तपासणी उत्तम आरोग्यासाठी लाभदायी – रो. विलास काळोखे 

एमपीसी न्यूज – सदृढ आरोग्यासाठी व्यायाम, आहार (Talegaon Dabhade) आवश्यक आहेच. पण यासोबतच नियमित वैद्यकीय तपासणी करणे देखील लाभदायी असल्याचे मत रोटरी सिटीचे संस्थापक अध्यक्ष रो. विलास काळोखे यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, स्माईल व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने व सॅफी ॲम्ब्युलन्स पुणे डिव्हिजन व महाराष्ट्र सिव्हिल फोर्स यांच्या सौजन्याने नुकतेच उर्से येथे मोफत आरोग्य, नेत्र व दंत तपासणी शिबिर संपन्न झाले. यावेळी काळोखे बोलत होते.

रो. काळोखे म्हणाले, “मानवी जीवनात आरोग्य अत्यंत महत्त्वाचे (Talegaon Dabhade) आहे. त्यासाठी योगासने, व्यायाम,चालणे, उत्तम आहार इत्यादी बाबींकडे आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येकाने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर नियमितपणे वैद्यकीय तपासणी करणे हे उत्तम आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे.

Alandi : नवरात्र उत्सवानिमित्त पद्मवती देवीने घेतले मनमोहक तुळजाभवानीचे रूप

स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक रो.हर्षल पंडीत यांच्या अनोख्या कामाचे काळोखे यांनी कौतुक केले. त्याचबरोबर सॅफी ॲम्ब्युलन्स व महाराष्ट्र सिव्हिल फोर्स यांच्या समाजसेवाभावी कार्याची त्यांनी माहिती दिली.

सॅफी ॲम्ब्युलन्स पुणे डिवीजनचे अध्यक्ष मुफतदल ताडीवाला यांनी त्यांच्या दोन्ही संस्था, डॉक्टर्स व सर्व टीम यांच्या कार्यपध्दतीची माहिती विशद केली. स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष रो. हर्षल पंडीत यांनी स्तुत्य उपक्रमाचे महत्त्व विशद करताना व्यसनमुक्ती केंद्राची माहिती सांगितली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी सिटीचे सेक्रेटरी रो. भगवान शिंदे यांनी केले. आभार रो. मधुकर गुरव यांनी मानले. सॅफी ॲम्ब्युलन्स डिवीजनचे अध्यक्ष मुफतदल ताडीवाला व महाराष्ट्र सिव्हिल फोर्स, आपत्ती व सुरक्षा व्यवस्थापन पुणे शहराचे कमांडो हसैन यांना सन्मानचिन्ह देऊन रो.विलास‌ काळोखे व रो.हर्षल पंडीत,रो.भगवान शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

मोफत आरोग्य शिबिरात 110 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 35 जणांना चष्मा लागल्याने मोफत चष्मे वाटप करण्यात आले. 4 जणांना मोतीबिंदू आढळल्याने पुढील शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. आवश्यक असलेली औषधे देण्यात आली.

रो.संजय वाघमारे,रो.विश्वास कदम,रो.दिपक फल्ले रो.रामनाथ कलावडे,रो.निखिल महापात्रा,रो.तानाजी मराठे,रो.दशरथ ढमढेरे, रो.बाळासाहेब चव्हाण प्रकल्प समन्वयक अमोल कुलकर्णी, प्रणव देशमुख, नितीन नाटेकर, रोहन यादव, राहुल केळकर,अनिल सावंत, हर्षल जोशी, राहुल बोरूडे, आनंद भागवत, प्रमोद महिषी, राजेश कांबळे इ.सह चारही संस्थांनी उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी (Talegaon Dabhade) विशेष परिश्रम घेतले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.