Pune Metro : मेट्रोच्या खांबांवरील अनधिकृत फलकांवर कारवाई

एमपीसी न्यूज – मेट्रोच्या खांबांवर जाहिरातींचे  (Pune Metro) फलक लावल्या प्रकरणी मेट्रोकडून कारवाई करण्यात आली. मेट्रोच्या खांबांवर तसेच स्टेशन परिसरात अनधिकृतपणे फलक लावल्यास संबंधितांवर मेट्रो अधिनियम 2002चे कलम 72, 73, 78 नुसार कारवाई केली जात आहे.

पुणे मेट्रोचा पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते सिव्हिल कोर्ट आणि वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक हे दोन मार्ग कार्यरत आहे. मागील काही दिवसात पुणे मेट्रोच्या उन्नत मार्गातील खांबांवर अनधिकृत फलक लावल्याचे निदर्शनास आले होते. त्यावर मेट्रोकडून वेळोवेळी कारवाई देखील करण्यात आली. रविवारी (दि. 22) पुन्हा कारवाई करत मेट्रोच्या खांबांवर लावलेले फलक काढण्यात आले आहेत.

मेट्रो ही सार्वजनिक संपत्ती आहे. तिचे विद्रुपीकरण केल्यास 500 रुपये आर्थिक दंड आणि सहा महिने ते 10 वर्ष पर्यंत (Pune Metro) कारावासाची तरतूद आहे. अनधिकृतपणे फलक लावल्यास संबंधितांवर मेट्रो अधिनियम 2002चे कलम 72, 73, 78 नुसार कारवाई केली जात आहे.

Alandi : नवरात्र उत्सवानिमित्त पद्मवती देवीने घेतले मनमोहक तुळजाभवानीचे रूप

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले, “अनधिकृत फलक लावल्यास मेट्रो कायद्यानुसार कार्यवाही करून संबंधितांवर गुन्हे नोंदवले जातील. मेट्रो ही सार्वजनिक संपत्ती आहे. तिचे विद्रूपकरण करू नये. मेट्रोचे खांब, स्थानके आणि मेट्रो स्थानकातील परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करावी.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.