PCMC : रेडीमिक्स काँक्रीट प्लांट चालकांना महापालिकेचा दणका

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या तसेच हवा आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या पुनावळेतील गायकवाड नगर आणि चिखली येथे सुरू असलेल्या गृहप्रकल्प बांधकाम साईटवरील रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांटवर पिंपरी- चिंचवड महापालिकेने कारवाई केली असून ते दोन्ही प्लांट सील(PCMC) करण्यात आले आहेत. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

 

आरएमसी प्लांटमधून मोठ्या प्रमाणात उडणाऱ्या धुळीमुळे आजूबाजूच्या रहिवाशांना आणि नागरिकांना श्वसनाचा तसेच, त्या प्रकल्पांमधून निघणाऱ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत आहे. या संदर्भात महापालिकेच्या पर्यावरण विभागास अनेक तक्रारी आल्या होत्या. तक्रारींची दखल घेऊन महापालिकेच्या पथकाने प्लॉट क्रमांक25, गायकवाडनगर, पुनावळे येथील एस.व्ही.टी. एन कंन्स्ट्रक्शन प्रा. लि. तर्फे सोमानी टॉवर्सची आणि चिखली येथील ऐश्वर्यम हमारा येथील आरएमसी प्लांटची प्रत्यक्ष पाहणी केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तसेच, महापालिकेचे ना हरकत दाखला व इतर आवश्यक परवाने त्यांच्याकडे नव्हती. ते परवानगी न घेता अनधिकृतपणे व्यवसाय चालवित असल्याचे महापालिकेच्या(PCMC) निदर्शनास आले.

 

महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण पथकातील प्रदीप महाले, जगन्नाथ काटे, बाबासाहेब ढोकळे, कनिष्ठ अभियंता स्वप्निल पाटील, मल्टिपर्पज वर्कर गोरक्षनाथ करपे, एमएसएफ व मेस्को जवानांच्या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.