PCMC : जाहिरात फलक परवाना नूतनीकरण न केल्यास दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – शहरातील जाहिरात फलकांसाठी महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाच्या वतीने परवानगी देण्यात येत असते. फलक परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे बंधनकारक असताना शहरातील 910 फलकधारकांनी आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून परवाने घेतले आहेत. उर्वरित जाहिरात फलकधारकांनी त्वरीत परवाना घ्यावा अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा आकाश चिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त संदीप खोत(PCMC) यांनी दिला आहे.

 

पिंपरी-चिंचवड शहरात 1 हजार 136 जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. त्यात काही फलक हे दोन्ही बाजूने आहेत. आतापर्यंत 910 जाहिरात फलक धारकांना आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून परवाने देण्यात आले आहेत. ते सर्व अधिकृत फलक असून, त्यांनी नूतनीकरण करून घेतले आहे.  परवाना नूतनीकरण न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

LokSabha Elections 2024 :  निवडणूक पारदर्शक होण्यासाठी सुक्ष्म नियोजनावर भर-डॉ. सुहास दिवसे

 

एक एप्रिलनंतर 3 महिने परवाना शुल्क न भरल्यास 10 टक्के दंड केला जाणार आहे. सहा महिने शुल्क न भरल्यास 25 टक्के दंड करण्यात येणार आहे. तसेच, परवाना रद्दची कारवाई करण्यात येणार आहे. दंड व कारवाई टाळण्यासाठी जाहिरात फलकधारकांनी तत्काळ शुल्क भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही खोत(PCMC) यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.