Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी बनविण्यात आली आहे…. खास ‘दिग्विजय योद्धा पगडी’

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात रेस कोर्स येते (  Pune) भव्य सभा होणार आहे. पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत. पुणे शहर भाजप आणि जिल्हा भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे.त्यासाठी पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून एक पगडी तयार करून घेण्यात आलेली आहे. दिग्विजय योद्धा पगडी अस या पगडीला नाव देण्यात आले आहे.

Chinchwad : मी सर्वप्रथम भारतीय ही भावना ठेवा – संजय भाटे

ही पगडी कॉटनची असून  संपूर्णपणे हाताने घडवलेली आहे. यामध्ये हवा खेळती रहाण्याची सोय आहे. पंचधातूचा वापर करून बनवलेली शुभचिन्हे या पगडीवर आहेत. तसेच ऐतिहासिक कोयऱ्या चांदीचे गोल्ड प्लेट्स, शिरोभागी आई तुळजाभवानीची प्रतिमा आहे. तसेच दिग्विजयाला साजेसा सात घोड्यांचा राजेशाही स्टॅन्ड असणारी , मराठा युद्धांच्या पराक्रमाची साक्ष देणारी मराठा दिग्विजय पगडी मोदी यांच्या सन्मान करण्यासाठी बनवण्यात आली (  Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.