Moshi : महापालिकेच्या जलवाहिनीला गळती, पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या सेक्टर 11 व 13 भागात स्पाईन रस्ता  (Moshi) येथील मुख्य जलवाहिनीला अचानक गळती झालेली आहे.त्यामुळे त्या ठिकाणी युद्धपातळीवर जलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.या सर्व परिसराचा आजचा यापुढील पाणीपुरवठा बंद राहील असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे.

Pune : पुण्यातील नालेसफाई 10 मे पर्यंत पूर्ण करावी, महापालिका आयुक्तांचे आदेश

महापालिकेच्या सेक्टर 11 व 13 भागात स्पाईन रस्ता येथील मुख्य  जलवाहिनी वरून होणारा चऱ्होली, मोशी, डूडूळगाव, बोऱ्हाडे वाडी, चोवीस वाडी, वडमुख वाडी,  देहू रस्ता,चक्रपाणी वसाहत, इंद्रायणी नगर,  सर्व प्राधिकरण सेक्टर 4,6,9,11, 13 इत्यादी तसेच चक्रपाणी वसाहत,सद्गुरूनगर या सर्व भागातील पाणी पुरवठा बंद करण्यात येत आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा चालू करण्यात येईल.

या सर्व परिसराचा आजचा यापुढील पाणीपुरवठा बंद राहील. तसेच उद्याचा पाणीपुरवठा हा अनियमित,कमी वेळ,कमी दाबाने आणि विस्कळीत राहील,याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. (Moshi) नागरिकांनी पाणी हे जपून वापरावे. महापालिका गळती लवकरात लवकर काढून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यास प्रयत्नशील असल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.