Pune Railway : एप्रिल महिन्यात पुणे रेल्वे विभागात 35 हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई; तीन कोटी 12 लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पुणे रेल्वे विभागात एप्रिल 2024 मध्ये तिकीट (Pune Railway )तपासणीदरम्यान 35 हजार 129 प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून 3 कोटी 12 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.
तसेच 14 हजार 463 प्रवाशांना अनियमित प्रवासासाठी 93 लाख 90 हजार(Pune Railway )रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या 243 प्रवाशांकडून 33 हजार 690 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इन्दू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.

 

Chinchwad : शहर पोलीस दलातील एक अधिकारी, चार अंमलदारांचा पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्राने गौरव

रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.