Railway News : दौंड ते अजमेर साप्ताहिक उन्हाळी विशेष गाडी

एमपीसी न्यूज – उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे झालेली प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दौंड ते अजमेर दरम्यान साप्ताहिक उन्हाळी विशेष दहा रेल्वे(Railway News) सोडल्या जाणार आहेत.

 

गाडी क्रमांक 09658 दौंड-अजमेर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष दिनांक 29 एप्रिल ते 1 जुलै या कालावधीत (10 फेऱ्या ) प्रति सोमवार दौंड येथून  रात्री 11.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 08.35 वाजता अजमेरला(Railway News) पोहोचेल.

 

गाडी क्रमांक 09657 अजमेर-दौंड सुपरफास्ट साप्ताहिक विशेष दिनांक 28 एप्रिल ते 30 जून या कालावधीत (10 फेऱ्या) दर रविवारी अजमेरहून सायंकाळी 07.55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 06.20 वाजता दौंडला(Railway News) पोहोचेल.

PCMC : जाहिरात फलक परवाना नूतनीकरण न केल्यास दंडात्मक कारवाई

ही गाडी पुणे, लोणावळा, पनवेल, वसई रोड, बोईसर, वापी, वलसाड, सुरत, भरूच, वडोदरा, गोध्रा, दाहोद, रतलाम, मंदसौर, नीमच, चित्तोडगड, चंदेरिया, भिलवाडा, विजयनगर आणि नसीराबाद येथे थांबेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.