Loksabha Election : सूक्ष्म नियोजनाद्वारे मतदार चिठ्ठीचे वाटप करावे – उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे

एमपीसी न्यूज – मतदार चिठ्ठीपासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करुन मतदार चिठ्ठीचे वाटप करावे अशी सूचना शिरुर लोकसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जुन्नरचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे(Loksabha Election) यांनी केली.

 

अवसरी बुद्रुक येथे शासकीय तंत्रनिकेतन परिसरातील कवयित्री शांता शेळके सभागृहात शिरुर लोकसभा मतदारसंघांतर्गत आंबेगाव विधानसभा मतदासंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात मार्गदर्शन करतानात ते बोलत होते. अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा आंबेगावचे  तहसीलदार संजय नागटिळक, निवडणूक नायब तहसीलदार सचिन वाघ(Loksabha Election) आणि नायब तहसीलदार अर्चना कोल्हे आदी यावेळी उपस्थित होते.

 

Pimpri : मतदारांच्या सोयीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच सर्व क्षेत्रीय कार्यालयात ‘नो युवर पोलिंग स्टेशन’ सुविधा

 

निवडणूक प्रक्रियेमधे मतदारांना मतदार चिठ्ठी वाटप करणे हे महत्वाचे कार्य असल्याने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे पर्यवेक्षक व सर्व क्षेत्रीय अधिकारी  यांनी मतदार चिठ्ठी अन्य व्यक्तीकडे न देता मतदार किंवा  कुटुंब प्रमुखाकडे देण्याची दक्षता घ्यावी. यासाठी सुक्ष्म नियोजन करुन समन्वयाने मतदार चिठ्ठीचे वाटप करावे आणि निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व कामकाज जबाबदारीने पार पाडावे. कोणताही मतदार मतदार चिठीवाचून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे श्री. शिंदे यांनी सांगितले. प्रशिक्षणात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक व क्षेत्रीय अधिकारी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.