Pune :पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण केलेल्या सात महिन्यांच्या बालकाची पोलीसांनी केली सुखरुप सुटका

एमपीसी न्यूज – पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या सात महिन्यांच्या बालकाची ( Pune )  कर्नाटकातील एका जोडप्याकडून बंडगार्डन पोलीस व पुणे पोलीसांनी सुखरुप सुटका केली   .

27 एप्रिल रोजी पहाटे श्रावण अजय तेलंग या  बालकाचे पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून अपहरण करण्यात आले होते . याबाबत त्याचे वडील अजय तेलंग बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

Pune : पुण्याचे किमान तापमान ही 29 अंशावर, पहाटे व सायंकाळी देखील जाणवतोय उकाडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजवरून 27 एप्रिल रोजी पहाटे श्रावणचे अनोळखी इसमांनी अपहरण करून त्यास त्यांच्याकडील चारचाकी कारमधून प्रथम इंडी जिल्हा विजापूर, राज्य कर्नाटक त्यानंतर विजापूर या ठिकाणी नेले. सदर ठिकाणी तपास  अधिकाऱ्यांना तात्काळ रवाना करण्यात आले. तेथे अधिकाऱ्यांनी आरोपी  चंद्रशेखर मालकाप्पा नलूगंडी ( वय 24 वर्षे रा. जांबगी ज़िल्हा विजापूर राज्य कर्नाटक ) यास चौकशीसाठी ताब्यात घेतले.  चौकशीत असे निष्पन्न झाले की, आरोपी  चंद्रशेखरने व त्याच्या इतर साथीदारांनी  श्रावणला  सुभाष पुत्तप्पा कांबळे ,( वय 55 वर्षे राह. लवंगी जिल्हा दक्षिण सोलापूर ) यांना विकले.

त्यानंतर पोलीसांनी सुभाष कांबळे यांचा शोध घेतला असता तो विजापूर शहरामधील एका हॉटेलमध्ये असल्याची  माहिती  मिळाली . पोलीसांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपी सुभाषला ताब्यात घेत  श्रावणची सुखरुप सुटका केली  . पुढील तपास पोलीस ( Pune )करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.