Pune : पुण्याचे किमान तापमान ही 29 अंशावर, पहाटे व सायंकाळी देखील जाणवतोय उकाडा

एमपीसी न्यूज –  पुण्याला एप्रिल महिन्यात उष्णतेचा चांगलाच फटका बसत ( Pune) असून महिन्याच्या शेवटी  कमाल तापमान हे 43 अंशावर तर किमान तापमान हे 29 अंशावर पोहचले आहे. त्याचाच परिणाम म्हणून पहाटे व सायंकाळी देखील उकाडा जाणवत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात राजस्थान, गुजरातमधून उष्ण वारे येत आहे. अवकाळी पावसाचे प्रमाणही कमी झाले असल्याने उष्म्यात वाढ झाली आहे. पुढील तीन दिवस राज्यात कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Kelgaon : वाहनांच्या रहदारीस अडथळा होणारा केळगाव रस्त्यावरील तो मोठा खड्डा पालिकेने बुजवला

केवळ विदर्भ मराठवाड्यात ऊन जाणवते असे नाही तर यंदा पुणेकरांनीही 40 पार असा उन्हाचा चटका अनुभवला आहे. याचाच परिणाम म्हणून लाहन मुलांमध्ये ताप, उलटी असे उष्माघाताचे प्रकार देखील वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार 5 मे पर्यंत पुण्यात आकाश निरभ्र राहणार असून पुण्याचे तापमान 41 ते 43 अंशाच्या दरम्यान राहणार आहे. यात सर्वाधीक म्हणजे 43 अंश तापमान हे  कोरेगाव पार्क, चिंचवड,लोहगाव या परिसरात राहणार आहे. तर इतर परिसरात 41 ते 42 अंश तापमान असे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर कामाव्यतीरीक्त पडू नका व बाहेर जात असाल तर ऊना पासून वाचण्यासाठीचे योग्य ते उपाय करा असे आवाहन हवामान खात्याने केले ( Pune) आहे.

 

आजचे किमान तापमान पुढील प्रमाणे –

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.