Kelgaon : वाहनांच्या रहदारीस अडथळा होणारा केळगाव रस्त्यावरील तो मोठा खड्डा पालिकेने बुजवला

 एमपीसी न्यूज – दि.5 एप्रिल रोजी आळंदी शहरास भामा आसखेड (Kelgaon) येथील पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी केळगाव येथे दोन ठिकाणी लिकेज झाली होती. दोन्ही ठिकाणच्या पाईप लाईन लिकेज दुरूस्ती साठी पालिकेच्या वतीने त्या ठिकाणी खड्डे करण्यात आले होते. त्यापैकी एक खड्डा बुजवून रस्ता दुरस्त करण्यात आला.

Pune : पुण्यात 30 मुलांचा एकत्रीत व्रतबंध सोहळा संपन्न

परंतु एके ठिकाणी मोठा खड्डा तसाच राहिल्याने त्या ठिकाणी रस्ता अरुंद होऊन त्याचा त्रास वाहनांच्या रहदारीस होत असल्याचे चित्र दिसून येत होते. यासंदर्भात एम पी सी न्युज ने दि.26 रोजी वृत्त प्रसारीत केले होते.त्याची तत्काळ दखल घेत आळंदी नगरपालिकेच्या वतीने दि.27 रोजी तेथील खड्डा बुजवण्यात आला.याबाबत माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी (Kelgaon) दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.