Nashik Accident : मुंबई आग्रा महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; दहा जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर जळगावकडून ( Nashik Accident ) नाशिकला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 प्रवासी जागीच ठार झाले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघात इतका भीषण होता की यामध्ये बसची एक बाजू पूर्ण कापली गेली. यामुळे त्या बाजूला बसलेले प्रवासी रस्त्यावर पडले. यात काहींचा जागीच मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकला धडकल्यानंतर भीषण अपघात झाला.

Pune :पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण केलेल्या सात महिन्यांच्या बालकाची पोलीसांनी केली सुखरुप सुटका

एसटी बस जळगावकडून नाशिकला जात होती. त्यावेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात झाला  . अपघातात एसटीची एक बाजू कापली गेली व अनेक प्रवासी रस्त्यावर पडले व मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जखमी प्रवाशांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले ( Nashik Accident ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.