Pune : नृत्य दिन:’अनुवेध’ मधून कथक नृत्याचे विलोभनीय दर्शन

एमपीसी न्यूज –  आंतरराष्ट्रीय नृत्यदिनानिमित्त ‘मनीषा नृत्यालय’च्या वतीने ( Pune  )  आयोजित  ‘अनुवेध ‘ या कथक नृत्याद्वारे नृत्य दिन:’अनुवेध’ मधून कथक नृत्याचे विलोभनीय दर्शन घडवले. यावेळी एकूण 135 नृत्यांगनांनी या सादरीकरणात सहभाग घेतला.

हा कार्यक्रम सोमवारी ( दि.29) रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड) येथे सायंकाळी 6 वाजता झाला.यावेळी अजय पराडे, शमा भाटे, अतुल उपाध्ये, अजय धोंगडे, केदार पंडित, रवींद्र दुर्वे ,नितीन सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

Nashik Accident : मुंबई आग्रा महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; दहा जणांचा मृत्यू

ज्येष्ठ लेखक आणि कला समीक्षक आशीष मोहन खोकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शांभवी दांडेकर,शिल्पा दातार, मंजिरी कारुळकर,पद्मश्री जोशी,पूर्वा शाह,मानसी गदो ,तेजस्विनी साठे, माधुरी आपटे,गौरी स्वकुळ, ईशा काथवटे,अदिती कुलकर्णी, पायल गोखले,वल्लरी आपटे,मिथिला भिडे,मधुरा आफळे यांनी आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी  कार्यक्रमात नृत्य सादर केले. ज्येष्ठ नृत्यगुरू मनीषा साठे यांनी एक श्लोकी रामायणावर आधारित एक नृत्यरचना  सादर केली .

त्यांच्या शिष्यांनी झपताल,रास नृत्य,चतरंग,देवी अभंग,पदन्यास,बंदिश,संयुज,गज झंपा  ताल,चांद्रयान पोवाडा,अभिसारिका बंदिश,कथक जेंबे,श्याम छबी,तराणा  आदी सादरीकरणे प्रभावीपणे सादर केली आणि उपस्थितांची वाहवा मिळवली. संपूर्ण नाट्यगृह नृत्य रसिकांनी भरले होते.

सूत्रसंचालन वल्लरी आपटे यांनी केले.  तर नृत्य कार्यक्रमाचे निवेदन अदिती कुलकर्णी यांनी केले.यावेळी मनिषा साठे यांच्या सर्व शिष्यांनी त्यांचा  सत्कार ( Pune  ) केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.