PCMC : सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्यासाठी पथक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सोनोग्राफी केंद्र व गर्भपात केंद्रांची तीन महिन्यांतून ( PCMC) एकदा अचानक तपासणी केली आणार आहे. बेकायदेशीर गर्भपात केले जाऊ नये. तसेच केंद्रातील नोंदवही व कागदपत्रांमध्ये काही फेरफार करत अवैध गोष्टींना प्रोत्साहन मिळू नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

शहरामध्ये सुमारे 400 रुग्णालयांची नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये महापालिकेकडे नोंद असलेले 140 गर्भपात केंद्र व 236 सोनोग्राफी केंद्र आहेत. केंद्रांमध्ये गर्भधारणेनंतर लिंगनिदान करण्यास बंदी आहे. तरीही बेकायदेशीरपणे गर्भलिंग चाचणी करून गर्भपात करण्यात येत आहे. याबाबत तक्रार करण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने प्रशासनाला कारवाई करता येत नाही. त्यासाठी शहरातील गर्भपात केंद्र व सोनोग्राफी केंद्रांवर अचानक तपासणी केली आणार आहे. त्यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Pune : नृत्य दिन:’अनुवेध’ मधून कथक नृत्याचे विलोभनीय दर्शन

याबाबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, सोनोग्राफी केंद्राने कायद्याचा भंग केल्याचे निदर्शनास आल्यास पीसीपीएनडीटी कायद्यानुसार त्यांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. शहरामध्ये अनेक सोनोग्राफी गर्भपात केंद्र कार्यरत आहेत. त्या केंद्रांमधून बेकायदेशीर गर्भपात होत नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून वैद्यकीय विभाग या केंद्रांची तपासणी करणार आहे. त्यासाठी तपासणी पथक नेमण्यात येणार आहे. ते पथक दर तीन महिन्यांतून कोणत्याही केंद्रावर पूर्वकल्पना न देता जाऊन तपासणी करेल, त्यामध्ये दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात ( PCMC)  येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.